मुक्ताईनगर : नगरपंचायतीने सन 2022-23 या आर्थिक वर्षाचा कुठलीही करवाढ नसलेला 24.72 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिकेच्या सोमवारी आयोजित विशेष बैठकीत मंजूर केला. यावेळी मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, प्रभारी नगराध्यक्षा मनीषा पाटील उपस्थित होत्या.
करवाढ नसल्याचा मोठा दिलासा
नगरपंचायतीचे लेखाधिकारी श्रीपाद मोरे यांनी 15 लाख 98 हजार 637 शिलकीचे तसेच 24.72 कोटी रुपयांचे कुठलीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकाला नगरपरीषदेच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आली. प्रमुख तरतुदींमध्ये तीन कोटी 53 लाख महसुली जमा, तीन कोटी 51 लाख 35 हजार महसुली खर्च, 21 कोटी 50 हजार भांडवली जमा, 21 कोटी 20 लाख 15 हजार भांडवली खर्च, रस्तानिधी 1 कोटी रुपये, जिल्हा नगरोत्थान महाअभियान एक कोटी रुपये, जिल्हा वार्षिक योजना दलित वस्ती दोन कोटी, अल्पसंख्यांक वस्ती 1.5 कोटी, नवनिर्मितसाठी तीन कोटी रुपये, 15वा वित्त आयोग दोन कोटी रुपये या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
विशेष सभेत यांची होती उपस्थिती
पाणीपुरवठा सभापती तथा नगरसेवक मुकेशचंद्र वानखेडे, गटनेते निलेश शिरसाट, नगरसेवक संतोष मराठे, नगरसेवक संतोष कोळी, नगरसेवक पियुष मोरे, नगरसेवक शेख शकील खाटीक, आरोग्य सभापती शबाना बी.अब्दुल आरीफ, नगरसेविका सविता भलभले, नगरसेविका नुसरत बी.महेबूब खान, नगरसेविका बिलकीस बी.अमानउल्ला खान, नगरसेविका साधना हरिश्चंद्र ससाणे, नगरसेविका बिलकीस बी.आसीफ बागवान आदी पालिका सदस्यांची उपस्थिती होती.