मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे आठवडे बाजार भरणार मंगळवारी

0

मुक्ताईनगर- मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी रविवार, 15 जुलै रोजी निवडणूक होत असून या दिवशी भरणारा आठवडे बाजार हा मतदानाच्या दिवशी येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी हा बाजार मंगळवार, 17 जुलै रोजी भरवण्यात येणार आहे. या संदर्भातील आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी काढले आहेत.