मुक्ताईनगर। मुक्ताईनगर ग्रामपंचायतीचे नगपंचायतमध्ये रुपांतर करण्याबाबत हालचाली पुन्हा गतीमान झाल्या आहेत मंत्रालय स्तरावरुन माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्याशी याबाबत संवाद देखील झाला. अशात सोमवार 3 रोजी मंत्रीमंडळ बैठकीत लोकनियुक्त सरपचं निवडीचा निर्णय जाहीर झाल्याने येथे नगपंचायत होण्याची शक्यता दाट झाली आहे. येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षीक निवडणुकीचे डोहाळे लागले आहे विद्यमान कार्यकारणीची मुदत संपत आल्याने येत्या डिसेंबरमध्ये निवडणुक लागणार आहे.
निधी परत जाण्याची भिती
तब्बल तीन वर्षापासुन येथे नगरपंचायतबाबतचा निर्णय थाबुन आहे गेल्या वर्षी राज्यातील 7 ग्रामपंचायतीचा केंद्र शासनाच्या अर्बन मिशनमध्ये निवड झाली. यात मुक्ताईनगरचाही समावेश असल्याने अलीकडे 52 कोटीची विकासकामे मंजुर झाली आहे. नगरपंचायत झाल्यास हा निधि परत जाऊ नये म्हणुन प्रयत्न सुरु आहे. मुक्ताईनगर ग्रामपंचायत बरखास्त करुन नगरपंचायत अध्यादेश काढणे संदर्भात हालचाली होत्या. याबाबत एकनाथराव खडसे यांच्या सोबत सचिव स्तरावर चर्चा ही झाली खडसे यांच्या आगामी मुंबई दौर्याप्रसंगी येथे ग्रामपंचायत की नगरपंचायत ही प्रतीक्षा निकाली निघण्याची चिन्हे आहेत.