मुक्ताईनगर नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर : 22 रोजी निवडणूक

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी 1जळगाव जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. शुक्रवार, 22 जुलै रोजी येथे नगराध्यक्ष पदाची निवड होणार आहे. नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षा नजमा तडवी यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 8 नोव्हेंबर रोजी अपात्र घोषित केले व तेव्हापासून नगराध्यक्ष पद रीक्त होते.

22 रोजी नगराध्यक्षांची होणार निवड
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी सोमवार, 18 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल व त्याच दिवशी छाननी होईल. 19 जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत अपिल करता येईल तर 20 रोजी वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार येईल तसेच गुरुवार, 21 सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे तर शुक्रवार, 22 रोजी नगराध्यक्षांची निवड होईल.