राज्यातील सहा नगर पंचायतींसाठी निवडणूक तर 11 नगर पंचायतीसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहिर ; 16 रोजी मतमोजणी
भुसावळ (गणेश वाघ)- राज्यातील सहा नगर पंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणूक तर 11 नगर पंचायतीसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला असून त्याबाबतची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त ज.स.सहारीया यांनी दिली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगर पंचायतीसाठी 15 रोजी निवडणूक होत असून 16 रोजी मतमोजणी होत आहे. त्याचप्रमाणे भोर, जि.पुणे, वडगाव, जि.पुणे, बार्शी टाकळी, जि.अकोला, वानाडोंगरी, जि.नागपूर, पारशिवनी, जि.नागपूर या नगर परीषदेसाठी सार्वत्रिक तर जव्हार (जि.पालघर), पोलादपूर (जि.रायगड), राजापूर (जि.रत्नागिरी), पंढरपूर (जि.सोलापूर), वाई (जि.सातारा), नंदुरबार (जि.नंदुरबार), लोहारा बु.॥ (जि.उस्मानाबाद), शेगाव (जि.बुलडाणा) या 11 जागी पोटनिवडणूक होत आहे.
25 रोजी निवडणूक, 26 रोजी निकाल
राज्य निवडणूक आयोगाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार 19 ते 25 जून दरम्यान नामनिर्देशन पत्र सादर करणे, 26 रोजी छाननी, 2 जुलै रोजी अपील नसल्यास उमेदवारी मागे घेणे तर 15 जुलै रोजी मतदान व 16 रोजी मतमोजणी होणार आहे.