मुक्ताईनगर- नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असलीतरी दुसर्या दिवशीही एकही उमेदवारांनी अर्ज सादर केला नसल्याची माहिती निवडणूक सूत्रांनी दिली. निवडणुकीनिमित्ताने नगरपरीषदेच्या कर वसुलीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून दोन दिवसात तब्बल तीन लाखांची कर वसुली झाल्याचे सूत्रांनी सांगितले तर रहिवासी दाखल्यांच्या माध्यमातून पहिल्या दिवशी सहा हजार तर दुसर्या दिवशी सात हजारांची वसुली झाली.