मुक्ताईनगर : उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चुरशीच्या ठरलेल्या आणि सर्व राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरलेेली मुक्ताईनगर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध होवून भाजपचा झेंडा फडकला आहे. तालुक्यातील मुक्ताईनगरसह चांगदेव व पिंप्रीनांदू येथील विविध कार्यकारी सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला होता. 5 जानेवारी माघारीची शेवटची मुदत होती त्यात मुक्ताईनगर आणि पिंप्रीनांदू येथील निवडणूक बिनविरोध झाली.
41 पैकी 5 उमेदवारी अर्ज नामंजूर
चांगदेव येथे 13 पैकी आरक्षित 4 जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित सर्वसाधारणच्या 8 जागांसाठी 9 तर ओबीसीच्या एका जागेसाठी दोघांमध्ये सरळ लढत आहे. तत्पूर्वी मुक्ताईनगरमध्ये 41 अर्जांपैकी पाच जणांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले होते.
36 पैकी 23 जणांचा रिंगणातून काढता पाय
उर्वरित 36 पैकी माघारीच्या दिवशी 23 जणांनी रिंगणातून काढता पाय घेतला. त्यामुळे योगेश कोलते, वसंत तळेले, पुरुषोत्तम महाजन, गणेश भोंबे, राजेंद्र तळेले, नामदेव मराठे, दिपक नाईक रामदास पुनासे, कडू तेली, काशिनाथ धनगर, संगिता बोदडे, नर्मदा सापधरे, संगिता बावणे हे उमेदवार विजयी झाले.
यांनी घेतली माघार
यामध्ये माघार घेणार्यांमध्ये रामदास सापधरे, राजू माळी, नितीन जैन, संदिप जावळे, प्रशांत भालशंकर, कडू सनासे, शेख कमर यांनी माघार घेतली. चांगदेव सोसायटीत 13 जागांसाठी 30 अर्ज प्राप्त झाले होते. भटक्या जाती जमातीसाठी विनय कचरे, उषा भोंबे, लता पाटील, अनुसुचित जाती जमातीसाठी लता सावकारे या चार जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित सर्वसाधारण 8 जागांसाठी निवडणूक होणार आहे.