मुक्ताईनगर-बोदवडला विकासकामांसाठी पाच कोटी मंजूर

माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या प्रयत्नांना यश

मुक्ताईनगर : माजी मंत्री एकनाथराव खडसे व अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्याकडे मुक्ताईनगरसह बोदवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मुक्ताईनगर व बोदवडमधील विविध प्रभागात विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेंतर्गत मंगळवार, 19 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार
मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत दोन कोटी 90 लक्ष रुपये आणि बोदवड नगरपंचायत हद्दीत दोन कोटी 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत या कामांना मंजुरी
प्रभाग क्रमांक 16 मध्ये मंजूर कामांमध्ये- मनोहर काळे यांच्या घरापासून ते योगेश झांबरे यांच्या घरापर्यंत काँक्रीट रोड, तुकाराम चौधरी ते डॉ.बोडे ते श्रीराम जैस्वाल यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार धापा बांधकाम, राजहंस टायपिंग ते अजय फडणीस ते किशोर सैतवाल यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार धापा बांधकाम करणे, वर्धमान रेसीडेन्सी ते अशोक पाटील ते राजू कोलते ते राजेंद्र हिवराळे यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार व धापा बांधकाम, सदाशीव चव्हाण ते हनुमान मंदिरापर्यंत आरसीसी गटार व धापा बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक पाचमध्ये सत्तार अब्बास खान यांच्या घरापासून ते नूर मोहम्मद खान यांच्या घरापर्यंत गटार धापा बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक पाचमध्ये महावीर मेडिकलपासून नागेश्वर मंदिरापर्यंत आरसीसी गटार व धापा बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक पाचमध्ये राजू ब्रह्मक्षत्रीय यांच्या घरापासून ते डीवायएसपी ऑफिसपर्यंत आरसीसी गटार व धापा बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक पाचमध्ये पाण्याचा हौद बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 13 मध्ये संदीप पाटील यांच्या घरापासून ते बाविस्कर सर ते विठ्ठल जोगी यांच्या घरापर्यंत
आरसीसी गटार, धापा बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 13 मध्ये लोखंडे पेंटर यांच्या घरापासून विनोद काटे ते कांडेलकर यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार व धापा बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 10 मध्ये मरकस मज्जीद ते उजव्या साईडपासून ते कलीम शहा ते बीएनखान यांच्या घरापर्यंत लादीकरण करणे, प्रभाग क्रमांक 10 मध्ये मण्यार मज्जीदच्या मागील बाजूस व पुढील बाजूस लादीकरण करणे, मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 10 मध्ये इकबाल सर यांच्या घरापासून ते शकील किराणा पर्यंत आरसीसी गटार व धापा बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक 11 मध्ये मजीद बेपारी यांच्या घरापासून ते सुलतान शेठ यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार व धापा बांधकाम करणे, मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमद छोटू यांच्या घरापासून हुसेन खाटीक यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार व धापा बांधकाम करणे, मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक आठमधील बुद्धविहार दुरुस्ती करणे, मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 13 मध्ये पुनर्वसन टप्पा क्रमांक तीन येथे पत्र्याचा डोम बांधकाम करणे, मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 13 मध्ये महेश इंगळे यांच्या प्लॉटपासून अरुण वराडे यांच्या घरापर्यंत काँक्रिट गटार बांधकाम करणे, मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये शरीफ खाटीक यांच्या घरापासून ते खलील मिस्त्री यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार धापा बांधकाम करणे, मुक्ताईनगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये बाळू जयकर यांच्या घरापासून ते वाहेद हसन यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, मुक्ताईनगर नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 13 मध्ये बोदवड रोड ते नीळकंठ महाजन यांच्या प्लॉटपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे आदी कामे मंजूर झाली आहेत.

बोदवड नगरपंचायत हद्दीत या कामांना मंजुरी
बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक दोनमध्ये प्रमोद पाटील यांच्या घरापासून ते बालसंस्कार केंद्रापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे, प्रभाग तीनमध्ये विविध ठिकाणी रस्ता ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक चारमध्ये मन्सूर बागवान यांच्या घरापासून ते रहिम बागवान यांच्या घरापर्यंत रस्ता ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक सातमध्ये विविध ठिकाणी रस्ता ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक आठमध्ये विविध ठिकाणी रस्ता ट्रीमिक्स काँक्रिटीकरण करणे, बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 14 मध्ये विविध ठिकाणी गटार बांधकाम करणे व हायमास्ट लाईट बसविणे (एल.ई.डी. दिवे वगळून), बोदवड नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 15 मधील मनुर रोड येथे सार्वजनिक सभागृह बांधकाम करणे व वाल कंपाऊंड बांधकाम करण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.