मुक्ताईनगर मोर्चाने दणाणले : नागरीकत्व कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करण्याची मागणी

0

मुक्ताईनगर : नागरीकत्व कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करावे तसेच एनआरसी त्वरीत रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील जामा मस्जिदपासून तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात शहर व तालुक्यातील हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले. प्रसंगी तहसीलदार व मुक्ताईनगर पोलिस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाला बहुजन क्रांती मोर्चा व संविधान बचाओ देश बचाओ या संघटनेसह तालुका नॅशनल काँग्रेसतर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला.

घोषणांनी मुक्ताईनगर दणाणले
केंद्र सरकार मुर्दाबाद, एन.आर.सी.नही रोजगार चाहिए, सी.ए.बी.नही रोजगार चाहिए, ये बिल वापस लो आदी घोषणा देण्यात आली तर नागरीकत्व दुरुस्ती विधेयकाची प्रत फाडण्यात आली. निवेदन तहसीलदारांमार्फत पंतप्रधान यांना देण्यात आले. नागरीकता दुरुस्ती विधेयक, नागरीक सुधारणा विधेयक 2019 तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली.

यांचा मोर्चात सहभाग
मोर्चात अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष आमीर साहेब, मन्यार बिरादरी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हकीम आर चौधरी, डॉ.जगदीश पाटील, तालुकाध्यक्ष आत्माराम जाधव, जाफर अली, आसीफ खान, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक, राजू खरे, नितीन गाळे, अफसर खान, जाफर अली, शकूर जमादार, शकील सर, आसीफ खान, शकील मेंबर, मुशीर मण्यार, रौफ खान, युनूस खान, आरीफ आजाद, मस्तान कुरेशी, अहेमद ठेकेदार व मुक्ताईनगर शहरातील सर्व मशिदीचे मौलाना तसेच अल्तमश तालिब सर, नाजीम सर आदी सहभागी झाले. मोर्चा यशस्वीतेसाठी जुबेर अली, अकिल शेख, रीजवान चौधरी, इरफान बागवान, सादिक खाटीक, जकीर जमादार, इम्रान खान, दाऊद खान यांनी परीश्रम घेतले.