मुक्ताईनगर येथील अंगणवाडी भरती मध्ये झालेल्या गैर प्रकाराची वरिष्ठांकडून चौकशी
मुक्ताईनगर गटविकास अधिकारी व एरंडोल बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे पथकाने केली चौकशी.
मुक्ताईनगर | प्रतिनिधी : मुक्ताईनगर येथील पंचायत समिती कार्यालयामध्ये 11 ऑगस्ट 2023 रोजी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा. पं) अनिकेत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली होती. बैठकीत मध्ये तालुक्यातील घरकूल अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रक्रिये विषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने आ चंद्रकांत पाटील यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचे दिसून येत असून सदर भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी अंकित यांचे भ्रमणध्वनी वरून बोलताना केली होती.
आ पाटील यांच्या मागणी नुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एरंडोल बालविकास प्रकल्प अधिकारी शैलजा पाटील व मुक्ताईनगर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निशा जाधव यांचे पथक चौकशी कामी नेमले होते.
१३ सप्टेंबर रोजी दोन्ही अधिकारी यांनी मुक्ताईनगर पंचायत समिती सभागृहामध्ये तक्रादार रेखा सुभाष सावळे रा. नायगाव , जयश्री रमेश सावळे रा. बेलसवाडी , प्राजक्ता निलेश कळसकर रा.तरोडा ता.मुक्ताईनगर यांना मुळ कागदपत्रे व दस्त ऐवज घेवून बोलविण्यात आले होते. पथकाने तिघे तक्रारदार यांचे मुळ कागदपत्रे यांची तपासणी केली .
प्रसंगी मुक्ताईनगरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी मेश्राम व कार्यालयीन अधीक्षक महाजन हे उपस्थित होते.
पथकातील अधिकाऱ्यांना या विषयी विचारले असता त्यांनी सांगितले की आम्ही आज अंगणवाडी भरती प्रक्रियेमधील तिघे तक्रारदारांची कागदपत्रे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशान्वये तपासलेले असून वरिष्ठांना अहवाल देण्यात येईल असे सांगितले.तसेच एका तक्रारदाराचे आडनाव चुकलेले असल्याचे निदर्शनास आणून दिल्या नंतर ती प्रिंटिंग मिस्टेक होती असे अधिकारी शैलजा पाटील यांनी सांगितले.
************
दरम्यान, अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्ट्राचार झालेला असून ही चौकशी निःपक्षपातीपणे झाली पाहिजे अन्यथा आंदोलन तसेच न्यायालयीन लढाईस तयार असल्याचे तक्रार दारांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले