मुक्ताईनगर येथून विवाहिता बेपत्ता

0

मुक्ताईनगर- शहरातील प्रवर्तन चौकातील 19 वर्षीय विवाहिता 13 रोजी संध्याकाळी सहा वाजेपासून बेपत्ता झाल्याने पोलसात हरवल्याची नोंद करण्यात आली. हरविलेल्या विवाहितेच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार विवाहिता 13 रोजी संध्याकाळी सहा वाजता दूध, साखर आणण्यासाठी जात,े असे सांगून घरातून निघाली मात्र घरी परतलीच नाही. तिने अंगात मरून रंगाचा टॉप व पिवळ्या रंगाची लॅगी, गळ्यात मंगळसूत्र , पायात चप्पल असा पोषाख परीधान केला आहे. विवाहिता शरीराने मध्यम गोरी, नाक सरळ, चेहरा गोल, तिच्या उजव्या हाताच्या बोटावर स्वतःचे नाव गोंदलेले आहे. विवाहिता कुणाला आढळल्यास मुक्ताईनगर पोलिसात संपर्क साधावा, असे आवाहन हेड कॉन्स्टेबल सादिक पटवे यांनी केले आहे.