मुक्ताईनगर : येथील जे.ई. स्कुलमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर होते. याप्रसंगी सभापती राजू माळी, उपसभापती प्रमिला राठोड, अरुणा पवार, बेबाबाई निकम, योगेश कोलते, सुधाकर चोपडे, गटशिक्षणाधिकारी जे.डी. पाटील, व्ही.डी. सरोदे, प्राचार्य आर.पी. पाटील, केंद्रप्रमुख राजू तडवी, दगडू तडवी, जे.बी. कांडेलकर, अनिल पाठक, प्रदिप कासोदे, संजय ठोसर, संजय भोसले, प्राचार्य आत्माराम मासुळे उपस्थित होते. जिल्हा शिक्षणाधिकारी देविदास महाजन व उपशिक्षणाधिकारी देवांग यांनी भेटी दिल्या.
विज्ञान प्रदर्शनात गटनिहाय विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांची नावे
इयत्ता सहावी ते आठवी गटात प्रथम क्रमांक अनिकेत नाना चव्हाण, पाणी व वीज बचत (जे.ई. स्कुल), द्वितीय माया सिताराम चौधरी – तरंगती बाग, जिल्हा परिषद शाळा कोथळी, तृतीय सानिका प्रदिप चौधरी मायक्रोस्कोप, आदर्श इंग्लिश मिडीयम तर उत्तेजनार्थमध्ये नम्रता निखिलेश यादव स्टीम पॉवर मॉडेल, डॉ. जगदिश पाटील स्कूल, सारंग बेलदार, सौरऊर्जा कूलर, जे.ई. स्कूल, नववी ते बारावी गटात प्रथम क्रमांक निपुण कुळकर्णी, घनकचरा व्यवस्थापन, जे.ई. स्कूल, द्वितीय क्रमांक रितेश पाटील, ऑटो फायर घाटे विद्यालय उचंदे, तृतीय प्रशांत साळुंखे आधुनिक मोटारकार, पुर्णामाई विद्यालय घोडसगाव, उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांमध्ये निखिल पवार मातीपासून वीज निर्मिती शिवाजी हायस्कूल, प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य निर्मिती गटात प्रथम क्रमांक शेख जावेद शेख मुनाफ उर्दू बॉईज स्कूल, गणितीय कृती, द्वितीय क्रमांक मनिषा किशोर चौधरी, पिंप्री अकाराऊत जिल्हा परिषद शाळा – कालमापन, तृतीय क्रमांक पल्लवी पिंपळे निमखेडी खुर्द जिल्हा परिषद शाळा काटे फिरवा बेरीज-वजाबाकी, माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती गट प्रथम क्रमांक मयुर सपकाळे नवीन माध्यमिक विद्यालय सुकळी, प्राथमिक शिक्षक गटात प्रथम क्रमांक अनंता कांडेलकर स्त्रीभृण हत्या, द्वितीय क्रमांक प्रदिप पाटील स्त्रीभृण हत्या, तृतीय क्रमांक सुधीर देवकाठे ग्रामीण लोकजीवन व दळणवळण यांचा समावेश आहे. प्रसंगी अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या प्रशिक्षणाला गेलेले सी.डी. पाटील, एस.एस. ठाकूर, पी.ए. पाटील यांचा गौरव करण्यात आला. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील 60 च्या वर शाळांनी सहभाग घेतला.