मुक्ताईनगर प्रतिनिधी…
-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲड.रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ॲड.रोहिणी खडसे यांना प्रदेश कार्यालय मुंबई येथे नियुक्तीचे पत्र दिलेयावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मावळत्या महीला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण, माजी मंत्री आ एकनाथराव खडसे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आ.नवाब मलिक, आ.बाळासाहेब पाटिल आ शशिकांत शिंदे. हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते
रोहिणी खडसे यांच्या नियुक्तीचा मुक्ताईनगर येथे फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुक्ताईनगर तर्फे प्रवर्तन चौक येथे महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष यु डी पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन राजे पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, युवक शहराध्यक्ष बबलू सापधरे,प्रविण पाटील, हरिष ससाणे, शेख शकील ,मस्तान कुरेशी, एजाज खान, प्रविण कांडेलकर, बाळा भालशंकर, संजय कोळी, संजय माळी, सोनु पाटील, विशाल रोटे रऊफ खान , राहुल पाटील, संदिप निलेश भालेराव, अनिस पटेल , हाशम शाह, विजय शिरोळे,मुस्ताक मण्यार, लताताई सावकारे, प्रविण दामोदरे, संदीप जुमळे, अन्नू पेंटर, इरफान खान , राहुल बोदडे, सुमित भालेराव, फिरोज खान, आकाश ससाणे, रफिक मिस्त्री, सिद्दिक सुपडू,रईस पटेल आणि पदाधिकारी उपस्थित होते