मुक्ताईनगर। आमदार एकनाथराव खडसे आणि खासदार रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्याने नाफेड अंतर्गत 20 मार्च रोजी बोदवड कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत मुक्ताईनगर आणि बोदवड येथे सुरू झालेल्या तुर खरेदी केंद्रावर खरेदी केलेल्या तूरीच्या पेमेंटचे धनादेश शेतकरी बांधवांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्याहस्ते मुक्ताईनगर उपबाजार येथे वितरित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पंचायत समिती सभापति शुभांगी भोलाणे, पंचायत समिती उपसभापती प्रल्हाद जंगले, योगेश कोलते, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, विद्या पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, संचालक विलास धायडे, कैलास पाटील, खरेदी विक्री संघ सभापती प्रभाकर झोपे, प्रदीप साळूंखे, चंद्रकांत भोलो, बाजार समिति संचालक मंडळ उपस्थित होते.