मुक्ताईनगर। भारतीय जनता युवा मोर्चातर्फे रेडक्रॉस दिनानिमित्त युवा भारत स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सोमवार 8 रोजी सकाळी 9 वाजता मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार रक्षा खडसेंची उपस्थिती होती.
यांची होती उपस्थिती
रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुका अध्यक्ष दशरथ कांडेलकर, तालुका सरचिटणीस सतीश चौधरी, जिल्हा चिटणीस राजू माळी, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शकील, जिल्हा परिषद सदस्य जयपाल बोदडे, जिल्हा परिषद सदस्या वैशाली तायडे, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाणे, उपसभापती प्रल्हाद जंगले, पंचायत समिती सदस्य सुवर्णा प्रदीप साळुंके, विकास पाटील, सरपंच ललित महाजन, ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी, ग्रामपंचायत सदस्य अनिल मालचे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष संजय पाटील, पवन खुरपडे, निलेश मालवेकर, दत्ता जोगी, सुनील श्रीखंडे, निलेश दैवे, सचिन पाटील, राजू कांडेलकर, हरीश बोदडे, झाकीर शेख या अभियानात सहभागी झाले होते.
रुग्णावर तातडीने उपचार
सकाळी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात रेडक्रॉस दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यानंतर खासदारांनी रुग्णालयात फेरफटका मारला असता, एक आजीबाई रडत असताना खासदारांना दिसल्या त्यांनी त्यांची विचारपूस केली असता त्या आजी बाईची नातीच्या पोटात दुखत असल्याकारणाने रुग्णालयात आणली होती तिच्यावर उपचारात दिरंगाई होत असल्याचे त्या आजीबाईंनी खासदारांना सांगितल्यावर त्वरित खासदारांनी डॉक्टरांना तातडीने उपचार सुरु करण्याबाबत सूचना दिल्या.
रुग्णालयातील समस्या सोडविणार
यावेळी रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांनी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे रुग्णालयासंदर्भात असलेल्या समस्या मांडल्या, यामध्ये उन्हाळा असतानांही रुग्णालयात पंखे सुरु नाहीत त्यामुळे रुग्णांना उकाडा असह्य झाला आहे. पाणी येत नाही अशा तक्रारी खासदारांकडे केल्या. खासदारांनी त्वरित या अडचणी दूर करण्याचा सूचना रुग्णालय प्रशासनाला केल्या. खासदार रक्षा खडसेंनी येत्या दोन दिवसात बैठक या संदर्भात बोलावली आहे. याप्रसंगी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.