माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांना यश
मुक्ताईनगर- मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मुक्ताईनगर, बोदवड व रावेर तालुक्यातील 42 गावांमधील मागासवर्गीय बांधवांसाठी समाजकल्याण विभागांतर्गत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या विशेष प्रयत्नाने खास बाब म्हणून महाराष्ट्रात सर्वात जास्त 600 घरकुलांना मंजुरी मिळाल्याने मागासवर्गीय बांधवांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.
हक्काची घरे मिळणार असल्याने समाधान
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या लोकांकडून घरकुलांची मागणी होत असलीतरी लक्षांक अत्यंत कमी असल्याने अनेक मागासवर्गीय बांधव हक्काच्या घरापासून वंचित होते यासाठी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सातत्याने घरकुलांसाठी मागणी करण्यात येत होती. खडसे यांनी समाज कल्याण विभागाचे मंत्री राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर महाराष्ट्रातील एकमेव मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील मागासवर्गीय बांधवांसाठी 600 घरकुलांना मंजुरी मिळाली. मुक्ताईनगर तालुक्यासाठी 250, बोदवड तालुक्यासाठी 250 तर रावेर तालुक्यातील 42 गावांमध्ये 100 अशा एकूण 600 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.
घरकुलाच्या लाभासाठी या आहेत अटी
अनुसूचित जातीच्या लाभार्थीकडे स्वतःची कमीत कमी तीनशे स्केअर फूट जागा असणे गरजेचे आहे व कच्चे घर असणे गरजेचे असून याच निकषाील लाभार्थींना घरकुलांचा लाभ मिळणार आहे. लाभार्थीने स्वतःचे घर स्वतः बांधकाम करावयाचे असल्याने त्यांना बांधकामाच्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने याचा निधी मिळणार आहे.