मुक्ताईनगर शहर खुनाने हादरले

Muktainagar taluka rocked by Murder : Woman was killed and body was thrown मु मुक्ताईनगर : क्रूर पद्धत्तीने महिलेची हत्या करीत मृतदेह कॅरीबॅगमध्ये टाकून तो मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर महामार्गावरील संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळ फेकण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात खुनांची मालिका कायम जनतेत भीती पसरली आहे. मयत महिला 35 ते 40 वयोवयातील आहे. मयत महिलेची ओळख पटल्यानंतर हत्याकांडाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे.

हत्या करून मृतदेह फेकल्याचा संशय
मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर महामार्गावरील संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे कुंड गावाजवळील पुलाच्या खालील बाजूस कॅरीबॅगमध्ये महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना सोमवारी सकाळी कळाल्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेतली. महिलेची क्रूरपणे हत्या केल्यानंतर मृतदेह जाड प्लॅस्टीकच्या कॅरीबॅगमध्ये टाकून संशयीतांनी पळ काढला. जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या महिलांच्या वर्णनावरून मयत महिलेचे वर्णन पोलिसांकडून तपासण्यात येत आहे.