मुक्ताईनगर सीडफार्म येथून दुचाकी लांबवली

Bike extended from Muktainagar Seed Farm मुक्ताईनगर : मुक्ताईनगर सीडफार्म येथून महावितरण कंपनीत कामास असलेल्या कर्मचार्‍याची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. याबाबत मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
तक्रारदार ईम्रान इसा पिंजारी (33, सीडफार्म, मुक्ताईनगर) यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.19 बी.एल.6930) 23 रोजी रात्री 11.30 ते 24 रोजीच्या सकाळी सात वाजेपूर्वी चोरट्यांनी लांबवली. तपास हवालदार मोहम्मद तडवी करीत आहेत.