मुक्ताई गाथ्याचे 19 रोजी यज्ञेश्‍वर आश्रमात प्रकाशन

0

मुक्ताईनगर- तालुक्यातील मेहुण-चिंचोल येथील श्री यज्ञेश्‍वर आश्रमात श्री संत आदिशक्ती मुक्ताई गाथ्याचे प्रकाशन रविवार, 19 मे 2019 रोजी सकाळी आठ वाजता होणार आहे. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री यज्ञेश्‍वर आश्रमाचे अध्यक्ष शारंगधर महाराज असतील. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चैनसुख संचेती, अंबादास महाराज, रामराव महाराज, सुधाकर महाराज, लक्ष्मण महाराज यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सार्थ गाथ्याचे लेखक अ‍ॅड.गोपाल दशरथ चौधरी (दाशरथी) आहेत. संत साहित्याचे अभ्यासक डॉ.जगदीश पाटील यांनी या गाथ्यात मुक्ताई चरीत्राचे लेखन केले आहे. त्याचप्रमाणे फैजपूर येथील कलाविष्कार ग्रुपने रेखाटलेल्या संत मुक्ताईंच्या तैलचित्रांचाही समावेश गाथ्यात करण्यात आला आहे. मुक्ताई गाथा प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.