मुक्ती फाऊंडेशनतर्फे वधु-वर, रोजगार मेळावा

0

जळगाव । सामाजिक सेवाभावी संस्था मुक्ती फाऊंडेशनतर्फे शारिरीक अपंग असलेल्या दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनार्थ वधु-वर परिचय मेळावा, स्वयंरोजगार मेळावा, गुणवंत पाल्य, गुणवंत सामाजिक कार्यकर्ते गौरव, वृक्षरोप वाटप, वृक्ष रोपण कार्याचे विशेष आयोजन ऑगस्ट महिन्यात होणार आहे. दिव्यांग वधु-वर मेळाव्यात अस्थिव्यंग, मुकबधिर असलेल्या पाल्यांच्या पालकांनी ज्यात मुलीचे वय 18 तर मुलाचे वय 21 असेल अशांसाठी उपस्थित रहावयाचे आहे. तसेच समाजात काही सुदृढ (मुल किंवा मुली) मोठ्या मनाचे जे व्यंगाला-व्यंगत्वाला जुमानत नाही त्यांनाही दिव्यांग साथी निवडावा असे वाटत असेल त्यांनीही उपस्थिती द्यावी. जात-पंथ लागू नसलेल्या वधु-वर (दिव्यांग) परिचय मेळाव्यात विवाह जमल्यास विना शुल्क संपूर्ण विवाह सोहळा, संसार पयोगी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.