जळगाव: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव शहराच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी ११.३० वाजता जळगाव विमानतळावर ते दाखल झाले. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी त्यांचे स्वागत केले. जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, आमदार चंदू पटेल, जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हाध्यक्ष संजीव पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ आदी उपस्थित होते.
‘अनुलोम’ या खाजगी संस्थेच्यावतीने जैन हिल्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यासाठी मुख्यमंत्री शहरात आले आहे.