मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रावेरात

0

खासदार रक्षा खडसेंच्या प्रचारार्थ सभा

भुसावळ- रावेर लोकसभेच्या खासदार व भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ रावेर येथे शुक्रवार, 19 रोजी दुपारी दिड वाजता बर्‍हाणपूर रस्त्यावर शिवप्रसाद नगराच्या मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होत आहे. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, उमेदवार खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार चैनसुखी संचेती, आमदार चंदूलाल पटेल, आमदार स्मिता वाघ यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.