मुंबई: राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरली आहे. मुख्यमंत्री फक्त मातोश्रीवरून कारभार करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून काम करणे अपेक्षित असते, मात्र ते मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निष्क्रिय असून त्यांना राज्यातील प्रश्नांची जाण नाही अशा शब्दात भाजपचे खासदार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री नाही, मुख्यमंत्री आहे तो मातोश्रीच्या पिंजऱ्यात आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
कोरोनाच्या बाबतीत सरकार गंभीर नाही, राज्यातील उद्योगधंदे कोलमडले आहे. महाराष्ट्रातील जनतेला कोणी वाली नाही, राज्याला अशा निष्क्रिय मुख्यमंत्र्यांची आवश्यकता नसून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी माझी असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. ४ महिन्यात या सरकारने महाराष्ट्राला १० वर्षे मागे नेले आहे असे आरोपही राणे यांनी केला आहे. त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.
आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची दर्शन घेऊ दिली नाही, त्यांनी वारकरी आणि भक्तांचा अपमान केला आहे असे आरोपही त्यांनी केले.