मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सुनिल धाकडला 3 लाख

0

शिरपूर । येथील सुनिल रमेश धाकड यांना लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रकियेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्यता निधीतून तीन लाख रुपयांची मदत मिळाली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून हे अर्थसहाय्य मंजुर झाले. ही रक्कम रुग्णाचे नावे अधिक्षक ज्युपिटर लाईफलाईन हॉस्पीटल, पुणे या नावाने वर्ग झाल्याचे पत्र भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते रुग्णास देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भाजपा शेतकरी आघाडीचे प्रदेशउपाध्यक्ष बापु खलाणे, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा चिटणीस संजय आसापूरे, शिरपुर कृउबा समिती संचालक चंद्रकांत पाटील, जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, शहराध्यक्ष हेमंत पाटील, भाजपा अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार, नगरसेवक किरण दलाल, खंडेराव बाबा मंदीर संस्थान अध्यक्ष कैलास धाकड, भुषण धाकड, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, शहराध्यक्ष अरमान मिस्तरी, विस्तारक सुनिल पाटील, तालुका उपाध्यक्ष मंगेश भदाणे, तालुका चिटणीस निलेश देशमुख, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, शहर चिटणीस राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, भटक्या विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बापु लोहार, शहराध्यक्ष रविंद्र भोई, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदू माळी, रविंद्र सोनार आदी उपस्थित होते. सुनिल धाकड यांच्यावर शस्त्रकियेसाठी तीन लाख रुपयाची मदत अरुण धोबी यांनी मिळवून दिल्याबद्दल धाकड कुटुंबियानी समाधान व्यक्त केले.