भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक दायीत्व म्हणून भुसावळ एस.टी.आगारातील कर्मचार्यांनी श्री गुरुदत्त मंदिर सेवा समितीतर्फे कोरोना बाधीतांना सहाय्य करण्यासाठी तहसीलदार दीपक धीवरे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 हजार 111 रुपयांचा धनादेश सोपवला. जगभरात कोरोना या विषाणूने थैमान घातले असून भारत सरकारने त्यावर वेळीच उपाय योजना केल्याने इतर देशांच्या तुलनेत आपण भारतीय कोरोनाशी समर्थपणे लढा देत आहोत. शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व एस.टी.कर्मचारी बांधील असून नागरीकांनी रस्त्यावर गर्दी न करता घरीच थांबावे तसेच काही दिवसातच कोरोनाशी असलेली लढाई आपण नक्कीच जिंकू, असा आत्मविश्वास कर्मचार्यांनी व्यक्त केला. सदर बाबीसाठी धर्मराज देवकर, किशोर आंबोले, किशोर नेवे, प्रमोद कोल्हे यांनी परीश्रम घेतले.