मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 51 हजारांची मदत

0

फैजपूर : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर फैजपूर येथील दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटीतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस 51 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश शनिवारी फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना सुपूर्द करण्यात आला.

प्रांताधिकार्‍यांकडे धनादेश सुपूर्द
फैजपूर येथील दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटीतर्फे नित्याने समाजपयोगी उपक्रम राबविणे, संकटकाळी धावून येणे असे सेवाभावी कार्य ही संस्था करीत असते व दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासत आली आहे. सध्या देशात कोरोनाचे संकट आहे म्हणून यानुसारच सर्व संचालक मंडळाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणारे उपायांना मदतीसाठी शासनास 51 हजार रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेऊन या मदतीचा शनिवारी फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांना सुपूर्द केला. चेअरमन हेमराज चौधरी व व्हा.नितीन राणे, संचालक चंद्रशेखर चौधरी व सेक्रेटरी सुनील क्षत्रिय यांच्या उपस्थितीत हा धनादेश देण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पालिका कर निरीक्षक बाजीराव नवले हे उपस्थित होते. दरम्यान दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासत आली आहे. यानुसारच सर्व संचालक मंडळाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जाणारे उपायांना मदतीसाठी शासनास 51 हजारांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.