मुख्यमंत्री 9 रोजी घेणार आढावा

0

जळगाव। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी 29 मे रोजी जिल्हा दौर्‍यावर आहे. जिल्हा दौर्‍यानिमित्त ते जिल्हा परिषदेत कामाचा आढावा बैठक घेणार होते. मात्र ही आढावा बैठक पुढे ढकलण्यात आली असून 9 जून रोजी ती घेण्यात येणार आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री सचिवालयाचे पत्र जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या कामासह मागेल त्याला शेततळे, कृषी पंप वीज जोडणी, स्वच्छ भारत अभियान, प्रधानमंत्री आवास योजना, पीक कर्ज पुनर्गठन, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना यांचा ते आढावा घेणार आहे.

या विषयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वात कमी कामगिरी असलेल्या दोन गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या कामाचाही ते आढावा घेणार आहे. जलयुक्त शिवार योजना, मुख्यमंत्री ग्रामसंडक योजना व प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतच्या कामांची पाहणी देखील ते करणार आहे. बैठकीस पालकमंत्र्यांसह सर्व कार्यालयाचे अधिकारी, जिल्ह्यातील खासदार, आमदार व संबंधितांना निमंत्रित करण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाची पुर्व तयारी सुरु आहे.