मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न; काळे झेंडे दाखविले

0

सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयातील दुष्काळी आढावा बैठक आटोपून सोलापूर विमानतळाकडे निघालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गाड्यांचा ताफा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडविण्याचा प्रयत्न केला़. याचवेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी ताफ्याला काळे झेंडे दाखवित भाजप सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी जिल्ह्याचा दुष्काळ आढावा बैठकीसाठी सोलापूर दौऱ्यावर होते़ सकाळी १० वाजता दुष्काळी आढावा बैठक, १२ वाजता महापालिकेच्या विकास कामांविषयी बैठक, त्यानंतर १ वाजता कायदा व सुव्यवस्थेची आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली़. त्यानंतर पत्रकार परिषद संपवून ते मुंबईला जाण्यासाठी सोलापूर विमानतळाकडे निघाले होते़. सोलापूर विमातनळ मार्गाकडे जाणाऱ्या एका हॉटेलसमोर राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवित मुख्यमंत्र्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.याचवेळी ताफ्यावर गाजर फेकत भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ताफ्यात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बाजूला करण्यासाठी पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.