मुख्यमंत्र्यांचा विरोध झुगारून पुण्यातील लॉकडाऊन उठविला: संजय राऊतांचे विधान

0

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे नेहमीच आरोप होत असतो. भाजपकडून सातत्याने हा आरोप केला जातो. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, एखाद्या मंत्र्यांच्या विभागाने घेतलेला निर्णयाची मुख्यमंत्र्यांना कल्पनाही नसते असे आरोप भाजपकडून केले जातात. दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील एक विधान केले आहे, त्यावरून महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे उघड होते. पुण्यातील लॉकडाऊनबाबत संजय राऊत यांनी विधान केले आहे. ‘पुण्यातील लॉकडाऊन उघडू नये, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका होती, लॉकडाऊन उघडण्यास मुख्यमंत्र्यांचा विरोध होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विरोध झुगारून पुण्यातील लॉकडाऊन उघडण्यात आला आहे’ असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. यावरून राऊत यांचा निशाणा नेमका कोणावर होता? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, त्यांच्या सुचनेनुसारच पुण्यातील लॉकडाऊन उघडण्यात आले आहे. दरम्यान राऊत यांच्या विधानावर अजित पवार काय बोलतात? याकडे लक्ष लागले आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. त्यातच काल एका पत्रकाराचा कोरोनामुळे निधन झाल्याने पुण्यातील लॉकडाऊन कायम ठेवण्याची आवश्यकता होती असे बोलले जात आहे.