नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी, दिंडोरी आणि धुळ्यात सभा घेत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘अर्धनग्न आंदोलन’ करणाऱ्या कृष्णा डोंगरे या तरुण शेतकऱ्याला येवला तालुका पोलिसांनी नजरकैद केले आहे. शेतमालाला भाव नाही म्हणून हा तरुण अशा अनोख्या पद्धतीने आंदोलन करत आहे. दोन दिवसांपूर्वी या तरुणाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही निवेदन दिले होते. आज येवल्यात मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कृष्णा डोंगरे यांनी कुठलीही निदर्शने करू नये, म्हणून काल संध्याकाळपासून स्थानिक पोलिसांनी त्याला नजरकैदेत ठेवले आहे.