नागपूर : नागुपरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून याच काळात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असणार्या नागपुरमध्ये गुन्हेगारी मोठ्याप्रमाणात वाढली असून मंगळवारी घडलेल्या घटनेने त्यांच्यावरच नामुष्की ओढवली आहे.
मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास खरबी चौकाजवळच्या लक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंटजवळ दोन कुख्यात गुंडांची हत्या करण्यात आली आहे. बादल शंभरकर आणि संजय बानोदे अशी या दोघांची नावे आहेत. तर तिसरा राजेश यादव गंभीर जखमी आहे. या दोघांना प्रतिस्पर्धी मेश्राम टोळीच्या गुंडांनी पाठलाग करुन ठार मारले. आधी मोटरसायकलला स्विफ्ट कारने उडवले आणि नंतर दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली.