गडचिरोली । चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे लोह खनिज प्रकल्प उभारणीच्या कोनशिला अनावरण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर नक्षली कारवायांच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल असलेल्या बामनपेठच्या तलावाजवळ उतरले.
तिथे तलावाच्या खोलीकरणाचा शुभारंभ करून ते हेलिकॉप्टरने परत जाण्यासाठी गेले असता काहीतरी बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर पुन्हा खाली उतरविले.