मुख्यमंत्र्यांनी वचनपूर्ती करावी !

0

पिंपरी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ रोजी पिंपरी चिंचवड येथे विविध शासकीय कामकाजाच्या उदघाटनासाठी येत आहे. या अगोदर देखील मुख्यमंत्री अनेक वेळा शहरात येऊन गेले त्यांनी शहरवासियांना घरे देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्याप आश्वासन पूर्ण केलेले नाही, आता मुख्यमंत्री पुन्हा शहर दौऱ्यावर येत असून त्यांनी आता तरी दिलेले आश्वासन पूर्ण करावे अशी मागणी ‘घर बचाव संघर्ष समिती’ने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राद्वारे केले आहे.

या अगोदरही २ वेळा मुख्यमंत्री यांनी शहरात कार्यक्रमानिमित्त आले असता घरे देण्याची आश्वासने दिली. परंतु खेदाची गोष्ट शहरातील महत्वाचे प्रश्न अद्यापही जैसे थेच आहेत. चिंचवड केशवनगर येथील मोरया क्रीडांगण येथे भूमिपूजन कार्यक्रमांनिमित्त मुख्यमंत्री येत आहेत. शास्तीकरास आपण जिझिया कराची उपमा देऊन ती करप्रणाली कशी जुलमी आहे हे पण आपण उललेखलेले होते. आज पुन्हा याच ठिकाणी आपण भूमीपूजनासाठी येत आहात अशी विनंती ‘घर बचाव संघर्ष समिती’ पत्राद्वारे केली आहे.