मुंबई । देशभरात आजपासून ’स्वच्छता ही सेवा’ या अभियानाची सुरूवात होत आहे. मुंबईत या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेचे केशरी रंगाचे जॅकेट, हातात ग्लोव्हज घालून हातात झाडू घेतला. मुंबई पालिकेच्या वतीने या मोहिमेचा शुभारंभ महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते सुभाष देसाई, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थित झाला.
1 ऑक्टोबरला स्वच्छता मोहीम
भायखळ्याच्या महात्मा फुले मंडईतून या अभियानाला सुरुवात करण्यात आली. अभियाना अंतर्गत स्वच्छतेसाठी श्रमदान केले जाणार आहे. त्यात पंचायतपासून बस स्टँड, हॉस्पिटल आणि सार्वजनिक ठिकाणांचा समावेश असणार आहे. 1 ऑक्टोबरला 15 निवडक ठिकाणी विशेष स्वच्छता मोहिम राबवली जाणार आहे. 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दूरदर्शनवर ’टॉयलेट – एक प्रेम कथा’ या सिनेमाचा वर्ल्ड प्रिमियर असणार आहे. 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि स्वच्छ भारत दिवसानिमित्त निबंध, शॉर्ट फिल्म आणि चित्रकला स्पर्धेसाठी बक्षिस वितरण केलं जाणार आहे.