मुख्यमंत्र्यांसमोर ‘लोकसंघर्ष’ची निदर्शने

0

महानिर्मिती प्रशासनाला इशारा ; 30 रोजी नवीन प्रकल्पात आंदोलन होणार

भुसावळ:- नैसर्गिक साधनांचा बचाव, वेल्हाळे नदीची प्रदूषणमुक्ती, स्थानिकांना रोजगार, सीएसआरच्या कामांची सखोल चौकशी व राखेच्या बंड कामाची चौकशी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी लोकसंघर्ष संघटनेतर्फे दीपनगर 660 प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी येत असलेल्या मुख्यमंत्र्यांसमोर निदर्शने केली जाणार आहेत. त्या संदर्भात महानिर्मिती प्रशासनाला इशारा देणारे निवेदनही देण्यात आले आहे.

या मागण्यांसाठी आंदोलन
दीपनगर येथील सामजिक दायीत्व निधीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. यासह अन्य मागण्यांसाठी निदर्शने व आगामी काळात अंगाला राख चोपडून आंदोलन केले जाणार आहे. नैसर्गिक संसाधनांमध्ये येणार्‍या जंगल, खनिज संपत्ती, जमीन, पाणी व पाणवठ्यातील अन्नाचे विविध स्त्रोत या परीसर राखमय झाला आहे. यामुळे या संपत्तीचे संरक्षण करणे, वेल्हाळे येथील नदी, तलाव व तापीनदी राखेमुळे प्रदूषित झाली आहे. विल्हाळे नवीन व तलावात राखेमुळे त्या भागातील शेती व शेतीपुरक उद्योग उद्ध्वस्त झाल्याने मासेमारी ही संपल्याने विल्हाळे बंडातील सेनोस्पिअर राख संकलीत करण्याची निविदा न काढता ग्रामसभेच्या ठरावानुसार स्थानिकांना हे काम दिले जावे, प्रस्तावित 660 औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील स्थानिक युवकांना रोजगार मिळावा व सक्षम असणार्‍या अटीशर्ती पूर्ण करणार्‍यांना निविदा मिळावी, सामाजिक दायित्वमध्ये सन 2015-16, 2016-17 या मागील तीन वर्षात झालेल्या सर्व कामांची चौकशी करुन त्यांचे सोशल ऑडीट करावे आदी मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा लोकसंघर्ष मोर्चाचे अशोक तायडे, जितेंद्र सोनवणे, सतीश पाटील, संतोष पाटील, चंद्रकांत चौधरी यांनी दिला.