मुख्य सचिवांना मारहाणप्रकरणी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आरोपी

0

नवी दिल्ली । नवी दिल्ली येथील सरकारच्या मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्याबरोबर झालेल्या मारहाणप्रकरणी दिल्ली पोलिसांत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दिल्लीतील पाटियाला हाऊस कोर्टात दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह आम आदमी पक्षाचे 11  आमदारांना आरोपी म्हणून घोषित केेले आहे.

सूत्रांच्या सांगण्यानुसार 19 ऑगस्टच्या रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्यासोबत मारहाण झालेल्या मारहाणीबाबत पोलिसांनी अनेक जणांचे जबाब नोंदविले होते. तसेच ठोस पुराव्यांसह आरोपुपत्रही तयार केले आहे.  आता याप्रकरणाची सुनावणी 25 ऑगस्टला होणार आहे.