मुख्य सभागृहात नेत्यांचे तैलचित्रे बसवावीत 

0
भाजप कार्यकर्त्यांनी केली मागणी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य सभागृहात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी संरक्षण मंत्री प्रमोद महाजन या भारतीय राजकारणातील प्रमुख तीन नेत्यांचे तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. शहरातील भाजपा निष्ठावंत कार्यकर्त्यांनी एकत्रीतरित्या भेट दिली. या भेटीत या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे महापौर यांच्याकडे ही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. महापौर हे सभागृहात सर्वसाररण सभेत असल्याने त्यांच्यावतीने हे निवेदन उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी स्वीकारले. यावेळी उपमहापौर चिंचवडे यांनी सांगितले की, हे निवेदन महापौरांना देऊन सभागृहात तैलचित्र लावण्याबाबत नक्की चर्चा करणार आहे. मुंडे आणि महाजन यांच्यामुळे भाजपला वेगळी ओळख मिळाली आहे. त्यामुळे ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.