जळगाव- शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. यामुळे महाविद्यालयाच्या आवारात प्रचंड तरूणांची गर्दी झाली होती. हा प्रकार महाविद्यालयातील प्राध्यापकांना कळताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतल्यानंतर हाणामारी करणाजया तरूणांनी पळ काढला. दरम्यान, या प्रकारामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला होता.