Expired pesticide stock worth six lakhs seized at Pimpalgaon Budruk भुसावळ : तालुक्यातील पिंपळगाव बुद्रूक येथील नितीनचंद्र बन्सीलाल जैन यांच्याकडे मुदतबाह्य व विना परवाना कीटकनाशकाचा साठा असल्याची गोपनीय कृषी विभागाला मिळाल्यानंतर अधिकार्यांनी छापा टाकून पाच लाख 87 हजार 495 रुपयांचा साठा जप्त केल्याने कीटकनाशके विक्री करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रूक येथील नितीनचंद्र बन्सीलाल जैन यांच्याकडे मुदतबाह्य व विनापरवाना किटक नाशके असून त्यांची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी नाशिक येथील कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर व कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय गुणवत्ता नियंत्रण पथकाने छापा टाकला. सर्वे नंबर 239 घर क्रमांक 744 व 745 या ठिकाणी विनापरवाना, मुदतबाह्य कीटकनाशकांचा साठा अनधिकृतपणे साठवणूक व विक्री होत असल्याचे उघड झाल्यानंतर संशयीत आरोपी नितीनचंद बन्सीलाल जैन यांच्याकडील साठा जप्त करून पंचनामा करण्यात आला.
यांची कारवाईप्रसंगी उपस्थिती
मोहिम अधिकारी विजय पवार, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, अभिनव माळी , गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज बढे, कपिल सुरवाडे तसेच वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ, उपनिरीक्षक परशुराम दळवी, हवालदार मनोहर पाटील, प्रशांत ठाकूर उपस्थित होते. वरणगाव पोलिस ठाण्यात मोहिम अधिकारी विजय पवार यांच्या फिर्यादीनुसार नितीनचंद्र जैन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमध्ये एकूण पाच लाख 87 हजार 485 रूपयांचा कीटकनाशकाचा साठा जप्त केला.
भविष्यातही कारवाई होणार
विनापरवाना, मुदतबाह्य व अवैध कीटकनाशकांची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास भविष्यात सुध्दा संबंधितांविरूध्द कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शेतकर्यांची कोणीही फसवणूक करू नये. अशा प्रकाराकडे कृषी विभागाचे लक्ष असून भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई सुरू राहणार असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाााचे मोहन वाघ म्हणाले.