कुसुंब्यात तक्रार : स्टेट बँक कर्ज देत नसल्याने नाराजी
कुसुंबा- रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील दत्तक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया रावेर शाखेकडून मुद्रा लोनसारख्या अनेक योजनांपासून सुशिक्षित बेरोजगार वंचित आहेत. स्टेट बँक रावेर शाखेत प्रधानमंत्री मुद्रा लोन, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, जनधन योजना, नॅशनल पेन्शन योजना, प्रधानमंत्री पीएमईजीपी योजना, एमएसएमई लोन अशा अनेक विविध योजना सुरू असून तालुक्यातील अनेक बँका बेरोजगारांना लोन देत आहेत. मात्र कुसुंबा येथील स्टेट बँक लोन देत नसल्याने ग्राहकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
चौकशी करण्याची मागणी
स्टेट बँक रावेर शाखेत कुसुंबा बु.॥ व कुसुंबा खुर्द येथील शेतकर्यांचे बचत खाते किसान क्रेडीट कार्ड खाते, बचत गटांचे खाते आणि सर्वसामान्य नागरिक खातेदार आहेत मात्र या बँकेच्या शाखेतून सरकारी योजनांमधील मुद्रा लोन दिले जात नाही तसेच बँकेतील अधिकार्यांना अनेक योजनांची माहिती नसल्याचे समोर येत असून लोन विभागातील सर्व कर्मचारी हे ग्राहकांशी उद्धटपणे वागतात तर ग्राहकांना योग्य असे मार्गदर्शन न करता त्यांना उलट दिशा दाखवण्याचे कार्य करीत आहे. अशा बोगस कर्मचार्यांची चौकशी करून संबंधित वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरीक करीत आहेत.
सेवा योजना पुरवण्यात याव्या
कुसुंबा गावातील अनेक नागरीक,शेतकरी स्टेट बँकेेचे खातेदार असल्याने अशा खातेदारांना योग्य मार्गदर्शन व योग्य त्या सुविधा पुरवण्याची जबाबदारी बँक प्रशासनाची आहे.मात्र बँक प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रसिद्धी पत्रक नागरीकांनी व खातेदारांनी दिले आहे.