मुरबाडमध्ये एका जागेवरून आघाडीत बिघाडी

0

मुरबाड । तालुक्यात 13 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या जी. प. व पं. स. निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व इंदिरा काँग्रेसची युती होणार असे संकेत माजी खासदार सुरेश टावरे यांनी दिले होते. मात्र, धसई जी.प. गटाची जागा काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस सोडत नसल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसची युती फिस्कटली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेबरोबर युती केली आहे, तर काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे काही गटात व गणात तिरंगी लढत होईल, तर काही ठिकाणी दुय्यम लढत आहे. त्यामुळे नामनिर्देशन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी फॉर्म भरण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले.

आपल्या भाषणात त्यांनी इ.स. 703 पासून आजपर्यंत जपान-भारत संबंधाचा सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक व आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयांच्या अनुषंगाने आढावा घेतला. या व्याख्यानात भारत-जापानसाठी एक आदर्श सांस्कृतिक देश असल्याचे आवर्जून सांगितले. जापान-भारत आंतराष्ट्रीय संबंधाने अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत व हे संबंध अतिशय घनिष्ठ स्वरूपाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे असे म्हणाले की, भारतात बुलेट ट्रेन येत आहे याचा मला आनंद होत आहे. भारतामध्ये बुलेट ट्रेनला असलेला विरोध हा चुकीचा असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले व बुलेट ट्रेनमुळे व्यापार, दळणवळण आणि रोजगाराच्या संधी प्राप्त होतील, अशी अशा व्यक्त केली. 2023 नंतर त्याच बुलेट ट्रेनची मुंबई-अहमदाबाद असा प्रवास करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला.

जपानकडून शिकण्यासारखे
जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी प्रो. मिजोकामी यांचे स्वागत केले. विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. डॉ. बेडेकर म्हणाले, जापानने ज्या पद्धतीने आर्थिक शैक्षणिक व तंत्रविज्ञान या क्षेत्रात देदीप्यमान प्रगती केली आहे. भारताचीही त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे. उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले की अनंत अडचणीवर मात करून प्रगती कशी करावी, हे जपानकडून शिकण्यासारखे आहे,
असेही ते म्हणाले.