मुर्तीच्या विटंबनेप्रकरणी पाच जणांना पोलिस कोठडी

0

जळगाव । शहरातील कोळीपेठ परिसरात गुरूवारी दुपारी रिक्षा कट लागल्राने झुंझार बहुउद्देशीय मंडळाच्या मंडपला धक्का लागून श्रीं ची मूर्ती विटंबणा होवून मोठ्या प्रमाणात जमाव रस्त्यावर रत्यावर उतरल्याने तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी पाच संशितयांना अटक केले असून त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपली असता त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येवून 4 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अन् दोन्ही गट आमने.-सामने
गुरुवारी दुपारी शेख आसिफ शेख अजुमुद्दीन हा रिक्षा घेवून कोळीपेठेकडे येत होता. त्यावेळी झुझांर बहुद्देशीर मंडळाच्या मंडपाला रिक्षाचा धक्का लागल्याने गणेशमुर्ती खाली पडून भंगली होती. त्यातुन रिक्षाचालक आसिफ व कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर त्या कुंटुंबातिल शेख अजुमुद्दीन शेख गुलाम हुसेन, शेख वसीम शेख अजुमुद्दीन, शेख यासिन शेख अजुमुद्दीन यांनीही वाद झातला. हा वाद विकोला गेला. त्यानतंर श्रीं ची मूर्ती भंगल्याची वार्ता पसरल्याने घटनास्थळी संतप्त मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जमाव झाला. यामुळे तणाव निर्माण होवून गोंधळ उडाला. पोलिसांच्या समजूतीनंतर सायंकाळी पाच वाजता वाद निवळला होता.

याप्रकरणी गोपाळ कैलास सैंदाणे यांच्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिसात याप्रकरणी 8 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर शेख अजुमुद्दीन गुलाम हुसेन, शेख आसिफ शेख अजुमुद्दीन, वसिम शेख अजुमुद्दीन व शेख रासीन अजुमुद्दीन तसेच तनविर शेख करीम या पाच जणांना अटक करण्यात येवून त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावल्यात आली होती. आज पाचही संशयितांच्या पोलिस कोठडीची मुदत संपली असता पाचही जणांना न्यायाधीश नेमाडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर त्यांनी 4 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.