विविध संस्थांच्यावतीने पोलिसांकडे मागणी
पिंपरी : सर्व धर्म, जाती, पंथांच्या अध्यात्मिक विचराष्ट्रसंत भगवान बाबा हे वंजारी समाजाचे दैवत आहे. भगवान बाबांचे विचार आचरणात आणणारे कोट्यवधी अनुयायी देशभर आहेत. मानवतेची, समानतेची, एकता व अखंडतेची शिकवण देणार्या या राष्ट्रसंतांच्या मुर्तीची विटंबना अहमदनगर जिल्ह्यातील स्वप्निल शिंदे या समाजकंटकाने दोन दिवसांपुर्वी केली. या घटनेतील आरोपीला कडक शिक्षा द्यावी या मागणीसाठी बुधवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात उद्योजक आबासाहेब नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली. याबाबतच्या मागणीचे निवेदन अतिरिक्त पोलिस आयुक्त मकरंद रानडे यांना देण्यात आले. यावेळी भगवान बाबा प्रतिष्ठान, जय भगवान युवा फाऊंडेशन, ओबीसी संघर्ष समिती, भगवान सेना, भगवान बाबा युवा मंच, जय भगवान महासंघ, भगवान बाबा मित्र मंडळ, ब्रम्हचैतन्य फाऊंडेशन, लोकनेते गोपीनाथ मुंडे जयंती कृती समिती पिंपरी-चिंचवड, मराठावाडा जन विकास मंच, लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, गोपीनाथ मुंडे फाऊंडेशन आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे देखील वाचा
निदर्शनामध्ये नगरसेवकांचा सहभाग
नगरसेवक केशव घोळवे, नगरसेविका योगिता नागरगोजे, प्रा.गणेश ढाकणे, कैलास सानप, दिपक नागरगोजे, खंडू खेडकर, डॉ. सुभाष ढाकणे, कुसूम नागरगोजे, जयश्री खरमाटे, आनंदा कुदळे, वैजनाथ शिरसाट, सुरेश गायकवाड, महादेव सानप, हनुमंत घुगे, लक्ष्मण मरकळ, विनोद मुंडे, व्हि.बी.सानप, अमोल नागरगोजे, ज्ञानेश्वर नागरगोजे, उद्धव हांगे, भागवत खेडकर, लक्ष्मण वाघ, राजश्री जायभाय, कविता आडाणे आदींनी सहभाग घेतला होता.