सोयगाव । सोयगाव तालुका पोलिस पाटील संघनेच्या वतिने सोयगाव-सिल्लोड मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांना विविध मागण्याचे निवेदन 19 बुधवार रोजी देण्यात आले असुन आमदार अब्दुल सत्तार यांनी या मागण्या विधानसभेत उपस्थित करुन मागणी मंजूर करुन घेण्याची मागणी पोलीस पाटील संघटनेच्या वतिने करण्यात आली आहे. या निवेदनात पोलीस पाटलांना दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे, पोलीस पाटलांचे नूतनीकरण कायमचे बंद करावे, शासनाने पोलीस पाटलांचा दोन लाख रुपयांचा विमा काढावा, अनुकंप तत्वावर पोलीस पाटलांच्या वारसांना पोलीस पाटील पदी नियुक्त करावे, सेवा निवृत्तीनंतर पोलिस पाटलांना पेंशन सुरु करावे, पोलीस पाटलांचे निवृत्ती चे वय 65 वर्ष करावे, पोलीस पाटलांना गृहविभागातील पदभरती मध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात यावे. पोलिस पाटील पद एका विभागा सोबत सलंग्न ठेवावे, मुलकी पाटीलकी रद्द करुन 1967 साल चे कलम दुरुस्त करण्यात यावे, व राज्यपाला कडुन आदर्श पोलीस पाटील पूरस्कार सुरु करण्यात यावा आदी दहा मागण्या करण्यात आल्या आहेत.
यांची होती उपस्थिती
दहा मागण्यासाठी सोयगाव तालुका पोलिस पाटील संघटनेच्या वतिने निवेदन देण्यात आले. यावेळी सोयगाव तालुका पोलीस पाटील संघनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी बावस्कर, उपाध्यक्ष भीमराव देसाई, धनराज सोनवणे, घनश्याम जाधव, गणेश घोगंडे, रमेश पाटील, ईश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर राठोड, विठ्ठल राठोड, दगडु इंगळे, संजय जाधव, सुनिल सुरळकर, विलास कुल्ले, समाधान खरे, देवराव तांगडे, शिवाजी पवार आदी पोलिस पाटलांची उपस्थिती होती.
आमदारांचे आश्वासन
दरम्यान या वेळी पोलीस पाटील संघनेच्या वतीने आमदार अब्दुल सत्तार यांचा शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला या सत्कारसमारंभा वेळी पोलिस पाटील संघटनेच्या मागण्या संदर्भात आपण विधानसभेत आवाज उठवीणार असल्याचे आश्वासन आमदारांनी दिले. यावेळी सोयगाव तालुका अध्यक्ष आबा काळे, झेडपी सदस्य गोपीचंद जाधव, उस्मान पठाण, रविंद्र बावस्कर, विलास वराडे यांची उपस्थिती होती.