मुलगी झाल्याने यावलच्या विवाहितेचा छळ

यावल : शहरातील माहेर असलेल्या विवाहितेचा मुलगी झाली म्हणून छळ करण्यात आला तसेच घेतलेले कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख न आणल्याने विवाहितेला माहेरी सोडण्यात आले. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
प्रणाली राहुल आमोदकर (24) या विवाहितेच्या फिर्यादीनुसार पती राहुल नोमदास आमोदकर, सासरे नोमदास नथ्थु आमोदकर, सासू नलिनी नोमदास आमोदकर, जेठ विकास नोमदास आमोदकरी व इंताजबाई शौकत सैय्यद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक आयपीएस अधिकारी आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान दिलावरखान, नितीन चव्हाण, हवालदार बालक बार्‍हे करीत आहे.