मुलांना वाचन संस्कृतीचे धडे दिले पाहीजेत : लक्ष्मण सुर्यभान

0

सणसवाडी । आजकाल मुले मोबाईलमुळे वेगळ्या विश्वात गुरफटली जात आहेत. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी पालक आणि शिक्षकांनी त्यांना वाचन संस्कृतीचे धडे दिले पाहीजेत, असे मत प्रसिद्ध साहित्यिक लक्ष्मण सूर्यभान यांनी व्यक्त केले. हवेली तालुक्यातील वढु खुर्द येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद
केंद्रप्रमुख अरूण मुंगसे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. सूर्यभान यांनी त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले ग्रामसेवक भाऊसाहेब हे पुस्तक शाळेला भेट दिले. यावेळी सुर्यभान यांनी मुलांशी हितगुज केले. यात त्यांनी पालक, पाल्य व शिक्षक यांचे ॠणांनुबंध कसे असावेत या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी केले कथावाचन
सरपंच अलका चोंधे, माजी सरपंच विलास खांदवे, माजी सरपंच अनिल चोंधे, उपसरपंच शारदा पवळे, ग्रामपंचायत सदस्या सविता काकडे, मिना खांदवे, अजित भंडलकर, सचिन भोंडवे, शितल तापकीर, रसिका चोंधे, अश्विनी दरेकर, लेखक कवी सचिन बेंडभरपाटील, लेखिका मिना म्हसे, शिक्षक विजय वनवे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. अंजली वाकुडकर, अश्विनी राठोड, रोहित निक्ते या विद्यार्थ्याने कथावाचन तर ओंकार ठुबे याने काव्यवाचन केले. मुख्याध्यापक सुदर्शना शेलार यांनी प्रास्ताविक तर सूत्रसंचालन सातवीची विद्यार्थीनी गौरी दरेकर हिने केले. आभार विजय वनवे यांनी मानले.