सजग नागरी मंचाचे विवेक वेलणकर यांचे मत
सांगवीः प्रत्येक क्षेत्रात आपल्याला संधी मिळते. त्याचा शोध घेऊन आवडते क्षेत्र निवडावे. निवडलेल्या क्षेत्रामध्ये करियर करावे, त्यातून हमखास यश मिळेल असे मत सजग नागरी मंचचे संस्थापक अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केले. जुनी सांगवीतील राही-माई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या दहावी-बारावी करियर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभप्रसंगी अध्यक्ष विवेक वेलणकर बोलत होते. ते म्हणाले, आज एमबीए, एमसीएच्या क्षेत्रामध्ये पुण्यातील मुलांची संख्या खूप कमी आहे. परप्रांतीय मुलांचीच सरशी आहे.भविष्य आपल्याच हातात आहे. मोबाईलपासून दूर राहून कष्ट करा यश आपलेच आहे
यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सिनेट सदस्य संतोष ढोरे, नितीन खोडदे, शिवलींग किणगे, नाना कड, गणेश काची, मनोहर ढोरे आदि उपस्थित होते. बारावीतील श्रध्दा जठार 92.46 टक्के, दहावीतील आदिती मोजिद्रा 97.60 टक्के, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कास्य पदक विजेती रमणसिंग सिंधू यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दहावी-बारावीतील परिसरातील 241 गुणवंत विद्यार्थांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नामदेव तळपे यांनी सूत्रसंचालन केले. आयोजक जवाहर ढोरे यांनी आभार मानले.