एसपी रोबोटिक्स या संस्थेतील 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी
पुणे : आजपर्यंत विविध काम करणारे रोबो आपण पाहिले आहेत. परंतु पुण्यात सहावी ते नववीच्या मुलांनी चक्क वाहतूक नियमन करणारा रोबो तयार केला आहे. या राबोचे प्रात्याक्षिक पुणे पोलीस आयुक्तलयात करण्यात आले. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. कें. व्यंकटेशम, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.
एसपी रोबोटिक्स या संस्थेमध्ये शिक्षण घेणार्या 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यांनी हा रोबोट तयार केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून यावर काम करून सहा मुलांनी हा रोबोट तयार केला आहे. हा रोबोट मोबाईलवर ऑपरेट केला जातो. वाहनचालकांना थांबण्याची व जाण्याची सूचना करतो. प्रत्येक कोणात वळू शकतो.
काळानुरूप यात सुधारणा केल्यास फायदेशीर
पोलीस आयुक्त व्यंकटेशम म्हणाले, या रोबोटचा वाहतूक पोलिसांना फायदा होणार आहे. वाहतूक नियमनाबरोबर काही संदेश वाहनचालकांना द्यायचा असेल तर तोही देता येणार आहे. मुलांनी अशाप्रकारे काम करून समाजउपयोगी गोष्टी तयार कराव्यात. सध्या हा रोबोट प्राथमिक अवस्थेत असून काळानुरूप यात सुधारणा केल्यास ट्रॅफिक पोलीसऐवजी या रोबोटच्या माध्यमातून वाहतूक नियमन करता येईल.