मुलांवर सामाजिक बांधिलकीचे संस्कार करा

0

तळेगाव दाभाडे । शालेय जीवनात गुणवान विद्यार्थी घडवत असतानाच शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर सामाजिक बांधिलकीचे संस्कारावर करणार्‍यावर अधिक भर द्यावा, असे प्रतिपादन पत्रकार एस. एन. गोपाळे यांनी केले. निगडे येथील प्रतिक विद्यानिकेतन या शाळेतील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी पर्यवेक्षक राधाकृष्ण येणारे, कामगार नेते संदीप पानसरे, मुख्याध्यापक उत्तम मांडे उपस्थित होते.

मुठभर धान्य आजी आजोबांकरीता या उपक्रमाअंतर्गत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांनी सुमारे 225 किलो तांदूळ जमा केला होता. हा तांदूळ जुन्नर येथील शिवनेर प्रतिष्ठानच्या राजाराम पाटील वृद्धाश्रमास प्रदान करण्यात आला. यावेळी घेतलेल्या सभेचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष खामकर, राजकुमार ढाकणे, चंद्रकांत मुरूमकर, बाळसाहेब गाढवे, वैभव मुरुमकर, प्रीतम अढीवळे, सुर्यकांत भोईरकर, प्रकाश थिटे, बाळसाहेब ढाकणे आदींनी प्रयत्न केले. वृद्धाश्रमाच्या वतीने संदीप पानसरे यांनी जमा केलेले धान्य स्वीकारले.