मुलांशी एकरुप होऊन पालकांनी संवाद साधावा

0

जळगाव । मुलांचे जन्मदाते होणे सोपे आहे. पण, त्यांच्या वय आणि इयत्तेनुसार त्यांना समजून घेत पालक होणे अवघड आहे. प्रत्येक पालकाला वाटते की मुलांनी मोठे, कतृर्त्ववान व्हावे, पण यासाठी आई बाबांनी देखील मुलांसारखेत लहान हेाऊन त्यांच्याशी एकरुप होत संवाद साधणे खूप गरजेचे असल्याचे मत केसीईचे शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी व्यक्त केले.

किलबिल बालक मंदीरात ’संवाद’ कार्यक्रम
केसीई विविधता व शालेय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने किलबिल बालक मंदिरात फक्त पुरूष पालकांसाठी आयोजित केलेल्या ’संवाद’ कार्यक्रमात बोलताना भंडारी पुढे म्हणाले, पालकत्व म्हणजे स्वनियंत्रणाचे शिक्षण होय. मुलांसोबत बाबांनी बसून त्यांचा कमीतकमी एक तास अभ्यास घ्यायला हवा. छोट्या मुलांना आईवडीलांशी बोलायचे असते. त्यांना त्यांचं छोटसं भावविश्‍व उलगडून दाखवायचे असते. तेव्हा मुलामुलींना वेळ देणे गरजेचे आहे.

मुख्याध्यापक चौधरी यांनीही केले मार्गदर्शन
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजूषा चौधरी पालकांशी संवाद साधताना म्हणाल्या की, पालकांची जीवनमूल्ये त्यांच्या श्रध्दा व चालीरिती हे मुलांच्या व्यक्तीमत्वाला आकार देतात. त्यामुळे आईवडीलांचा सहवास मुलांना हवा असतो. शालेय विभागाचे समन्वयक के.जी. फेगडे साथ साथ कार्यक्रमास उपस्थित होते. सुत्रसंचलन अर्चना चौधरी यांनी केले. साथ साथ कार्यक्रमात पुरूष पालकांनी विविध प्रश्‍न, शंका विचारत सहभाग नोंदवला व फक्त पुरूष पालकांसाठी दोनदा घेतलेल्या सहविचार सभेचे कौतुकही केले.